
no images were found
गणपतीपुळ्याकडे जाताना पुण्याचे बापलेक अपघात ठार; तिघेजण गंभीर जखमी
कोल्हापूर : पुण्याहून गणपतीपुळेकडे कुटुंबासह देवदर्शनासाठी निघाले असताना सांगली जिल्ह्यातील कोकरुड येथे कारला सोमवारी झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा दुर्दैवी अंत झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
कराड-रत्नागिरी राज्य महामार्गावर कोकरुड येथे वारणा नदीवर असलेल्या कोकरुड-नेर्ले पुलावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या दुभाजकाला कार धडकल्याने वडिलांचा आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ऋषिकेश घोगरे हे कार घेऊन पत्नी रेणुका, चुलत भाऊ महेंद्र, रुपाली, आरव व शिवेंद्र हे सर्वजण सकाळी पुण्यावरुन गणपतीपुळे, रत्नागिरी येथे देवदर्शनासाठी निघाले होते. महेंद्र आणि आरव हे कार चालकाच्या बाजूला बसले होते. कारमध्ये पाठिमागे बसलेले रुपाली व शिवेंद्र हे जखमी झाले आहेत. जखमींना ताताडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महेंद्र अशोक घोगरे (वय 35), आरव महेंद्र घोगरे (वय 4, बावडा -वकिलवस्ती, जि. पुणे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.