
no images were found
अचानक प्रकृती खालावल्याने माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना विधानभवनातून खासगी रुग्णालयात दाखल
नागपूर : भाजप आमदार, राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना आज अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तातडीने विधानभवनात अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे.
आ. बबनराव पाचपुते यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज दुपारी विधान भवनात त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. सहकाऱ्यांसह परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते गेले. येथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तुर्तास त्यांनी प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.