no images were found
खडकवासला धरणात तरुण-तरुणीचा मृतदेह; आत्महत्येची शक्यता ?
पुणे : जिल्ह्यातील खडकवासला धरणात बुडून तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हवेली पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. अद्यापही मृतदेहांची ओळख पटलेली नसल्यामुळे मृत्यूचे कारणंही अद्याप अस्पष्ट आहे. या दोघांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आले.
सोनापूर गावाच्या हद्दीत ही घटना घडली असून एका स्थानिक नागरिकांना रस्त्याच्या कडेला एक दुचाकी दिसली. आजूबाजूला कोणीही न दिसल्याने त्याने पुढे धरणाच्या पाण्याकडे जाऊन पाहिले असता पाण्यात दोन मृतदेह तरंगताना दिसले. त्याने तातडीने ही माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली. या स्थानिकाची खाद्यपदार्थाची टपरी आहे. हा विक्रेता सुट्टीच्या दिवशी आणि शनिवारी-रविवारी आपली खाद्यपदार्थाची टपरी चालवतो. रस्त्याने जाताना त्या स्थानिकाला हा प्रकार दिसला. पोलिसांनी सगळ्या परिसराची पाहणी केली शिवाय स्थानिक टपरी चालकाने दिलेल्या माहितीवरुन गाडीची देखील पाहणी केली. गाडीच्या नंबरवरून दोघांपैकी एक जण सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, अजूनही कोणाची माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. तरुणीच्या बॅगमध्ये असलेल्या वहीवर प्रियंका चौगुले असे नाव लिहिलेले आहे.