no images were found
महापालिकेच्या आरोग्य, बागा व पवडी कामगारांना सुरक्षतेसाठी 2500 रिफ्लेटींग जॅकेटचे वाटप
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सुवर्ण महोत्सव वर्धापन दिनानिमित्त आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कर्मचा-यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सफाई, बागा व पवडी कर्मचा-यांना 2500 रिफ्लेटींग जॅकेटचे वाटप करण्यात आले. हे जॅकेट प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते महापालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात कर्मचा-यांना देण्यात आली.
महापालिकेच्यावतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियान राबविण्यात येत आहे. आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत झाडू व सफाई कर्मचारी दैनंदिन शहरातील रस्त्यांचची व इतर परिसराची स्वच्छता करण्याचे काम जबाबदारीने करत असतात. त्याचबरोबर पवडी कामगार, बागा कामगार हे ही बागेमध्ये रस्त्याच्या बाजूची कामेकरीत असतात हे सर्व कर्मचारी रहदारीच्या ठिकाणी न थांबता काम करत असतात. या कर्मचा-यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 2500 रिफ्लेटींग जॅकेट खरेदी करण्यात आले आहेत. हे रिफ्लेटींग जॅकेट 90 जीएसएम क्षमतेचे असून सुरक्षेतेचे दृष्टीने योग्य आहे कि नाही याची तपासणी करुन घेऊनच घेण्यात आली आहेत. या रिफ्लेटींग जॅकेटसाठी रु. 3,75000/- इतका खर्च करण्यात आला आहे. या जॅकेटमुळे कर्मचाऱ्यांना रस्त्यावर काम करताना सुरक्षा मिळेल.
झाडू, सफाई, पवडी, बागा खातेकडील 14 कर्मचा-यांचा उत्कृष्ट व प्रामाणिकतेबद्दल सत्कार
सुवर्ण महोत्सव वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या आरोग्य, झाडू, सफाई, पवडी, बागा खातेकडील 14 कर्मचा-यांचा उत्कृष्ट व प्रामाणिकतेबद्दल सत्कार करण्यात आला. या कर्मचा-यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोप देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये आरोग्य घनकचरा व्यवस्थापन कडील राजु कांबळे, सुधिर कांबळे, दिलिप शिर्के, विमल कांबळे, योगेश घोरपडे, विजय घुणकीकर, संजय कांबळे, नरेश कदम, कुणाल आदमाने, सदानंद कांबळे, मालुबाई देवकूळे, राजू जोंधळे, रमेश झावरे, राजेंद्र कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, सहा.आयुक्त विनायक औंधकर, टिना गवळी, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक मिलिंद कुलकर्णी, मुख्य लेखाधिकारी सुनिल काटे, मुख्यलेखापाल संजय सरनाईक, जल अभियंता हर्षजित घाटगे, अंतर्गत लेखापरिक्षक संजय भोसले, उप-शहर अभियंता नारायण भोसले, एन.एस.पाटील, सतिष फप्पे, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक अशोक यादव, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, नगरसचिव सुनिल बीद्रे, कर निर्धारक सुधाकर चल्लावाड, अग्निशमन दलाचे जवान, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थीनी, व्यायामशाळा प्रशिक्षक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.