
no images were found
सोनाटा ने नवे कलेक्शन सोनाटा अनव्हेल २.० केले लाँच
भारतातील सर्वाधिक विक्री नोंदवणारा घड्याळांचा ब्रँड, टायटन कंपनी लिमिटेडच्या सोनाटाने महाराष्ट्रामध्ये आपल्या व्यवसाय विस्ताराची घोडदौड कायम राखली आहे. सोनाटासाठी पाच सर्वाधिक महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक सारख्या महाराष्ट्रातील शहरांमध्ये उत्तमोत्तम उत्पादने सादर करून हा ब्रँड आपले स्थान सातत्याने मजबूत करत आहे. आता सोनाटा पुरुष व महिलांसाठी बनवलेले आपले सर्वात नवे कलेक्शन अनव्हेल २.० लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. सोनाटा अनव्हेल २.० कलेक्शन, स्केलेटल क्वार्ट्झ घड्याळामध्ये आकर्षक डिझाईन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. २००० ते ३००० रुपयांदरम्यान किमतीची ही घड्याळांची नवी श्रेणी ब्रँड पोर्टफोलिओमध्ये दाखल होत आहे. पुरुष आणि स्त्रिया प्रत्येकासाठी अनव्हेलमध्ये १० पेक्षा जास्त डिझाईन्स आहेत. टायटन कंपनी लिमिटेडमध्ये एसएफ आणि सोनाटाचे मार्केटिंग हेड श्री. सुबिश सुधाकरन म्हणाले, सोनाटा घड्याळांसाठी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राने नेहमीच खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नुकतेच या ब्रँडने आपली नवी कॅम्पेन फिल्म युअर स्टाईल दॅट शाईन्स नुकतीच लॉन्च केली आहे, ज्यामध्ये प्रशंसेची अतुलनीय शक्ती दर्शवण्यात आली आहे. सोनाटामध्ये प्रत्येकासाठी आणि प्रत्येक प्रसंगासाठी घड्याळे आहेत – पुरुष, स्त्रिया आणि तरुणांसाठी फॅशन, स्पोर्टी, फॉर्मल, ड्रेस, ट्रॅडिशनल अशा विविध प्रकारची घड्याळे आहेत. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सोनाटा ब्रँड दरवर्षी तब्बल ५.५ मिलियन घड्याळांची विक्री नोंदवतो.