
no images were found
महापालिकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुवर्ण महोत्सव वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात सकाळी 9 वाजता प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बोलताना दोन वर्षाच्या कोरोनाकाळात व शहरात आलेल्या महापूरात महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. कोल्हापूरात एक चांगली गोष्ट आहे की चांगल्या गोष्टीसाठी एखादे पाऊल उचलले की नागरीक व सामाजिक संस्था स्वत: फुढे येऊन आपला सहभाग नोंदविता. हेच आपले यश आहे. शहरातील प्रत्येक नागरीक जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ज्या एका संस्थेशी संपर्कात असतो ती म्हणंजे आपली महानगरपालिका. प्रत्येक कर्मचारी, अधिकारी अथवा व्यक्ती यांचे जीवनामध्ये काहीना काही तरी योगदान असते परंतू हे योगदान देत असताना आपल्याला कोठे सुधारण्याची गरज आहे, कोठे चांगली कामगीरी करुन दाखण्याची गरज आहे हे प्रत्येका समोर असले पाहीजे. महापालिकेने यावर्षी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये सर्वांचे योगदान आवश्यक आहे. पुढील वर्धापन दिनादिवशी यावर्षी पेक्षाही जास्त सत्कार होतील त्याबद्दल मला खात्री आहे. महापालिका यावर्षी केंद्र शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षण रँकमध्ये नकीच अव्वल येण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी सर्वानी आपले योगदान दिले पाहिजे. यासाठी नागरीक असतील, कर्मचारी कर्मचा-यांनी आपला परिसर कसा स्वच्छ दिसेल यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले. यानंतर त्यांनी सर्वांना महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, टिना गवळी, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक मिलिंद कुलकर्णी, मुख्यलेखापाल संजय सरनाईक, मुख्य लेखाधिकारी सुनिल काटे, जल अभियंता हर्षजित घाटगे, उप-शहर अभियंता नारायण भोसले, एन.एस.पाटील, सतिष फप्पे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक अशोक यादव, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, नगरसचिव सुनिल बीद्रे, कर निर्धारक सुधाकर चल्लावाड, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, अग्निशमन दलाचे जवान, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थीनी, व्यायामशाळा प्रशिक्षक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.