
no images were found
महानगरपालिकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्य वृक्षारोपण
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी शहरामध्ये पाच हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. सकाळी पंचगंगा घाट येथील गायकवाढ पुतळा येथील महापालिकेच्या ओपनस्पेमध्ये प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी उपआयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता नत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टिना गवळी उपस्थित होते. त्याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेता सुबोध भावे हे चित्रपट संत तुकाराम या चित्रपटाच्या शुटींगकरीता पंचगंगा नदीकाठावर उपस्थित होते त्यांना महापालिकेच्या वर्धापनादिनानिमित्त आयोजीत वृक्षारोपनाच्या उपक्रमाबद्दल माहिती कळताच त्यांनी स्वत: या उपक्रमात सहभागी होऊन वृक्षारोपन केले.
या उपक्रमाअंतर्गत कसबा बावडा झूम प्रकल्प या ठिकाणी उप-आयुक्त रविकांत आडसूल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच पुईखडी जलशुध्दीकेंद्रातील मुख्य रस्त्याच्या बाजूस सहा.आयुक्त विनायक औंधकर, उप-शहर अभियंता एन.एस.पाटील, सर्व कनिष्ठ अभियंता यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आला , पुईखडी बायोगॅस प्रकल्पा जवळ, कसबा बावडा कचरा प्रकल्प, कसबा बावडा फिल्टर हॉऊस या ठिकाणी महापालिकेच्या विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपन केले.