
no images were found
महापालिका कर्मचाऱ्याच्यावतीने पंचगंगा स्मशानभुमीस 50 हजार शेणी दान
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्याच्यावतीने 50 हजार शेणी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या. पंचगंगा स्मशानभुमीस महापालिकेचे कर्मचारी दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त शेणी दान देतात. महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात या शेणी सुपूर्द करण्यात आल्या.
महापालिका कर्मचाऱ्याकडून गेली 10 वर्षे पंचगंगा स्मशानभुमीस शेणी प्रदान करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रथम 10 हजार शेणी, दुसऱ्या 20 हजार शेणी, तिसऱ्या वर्षी 30 हजार, फायर एक्स्टयुगेशर व भिंतीवरील मोठे घडयाळ व चौथ्या वर्षी 30 हजार शेणी, पाचव्या वर्षी 40 हजार व सहाव्या वर्षी 40 हजार, सातव्या वर्षी 40 हजार शेणी व आठव्या वर्षी 40 हजार, नव्या वर्षी 35 हजार व यावर्षी ही 50 हजार शेणी सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त विनायक औंधकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, अंतर्गत लेखापरिक्षक संजय भोसले, पशु वैद्यकीय अधिकारी विजय पाटील, विजय वणकुंद्रे,महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.