
no images were found
महापालिकेच्या वतीने वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा सत्कार
कोल्हापूर : महापालिकेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावित असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा महापालिकेच्यावतीने गुरुवारी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते शाल, साडीचोळी, रोप व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये जवान निवृत्ती मरळे यांची सून ज्योति मरळे, जवान लक्ष्मण रावराणे यांची सून स्मिता रावराणे, जवान जयसिंग भोसले यांची पत्नी श्रीमती कांचनदेवी भोसले, कॅप्टन शंकर वालकर यांची वहीनी सौ.माणिक वालकर, जवान सुनिल चिले यांचे भाऊ अनिल चिले, मेजर मच्छिंद्र देसाई यांची पत्नी श्रीमती सुनिता देसाई, जवान दिगंबर उलपे यांची आई श्रीमती आनंदी उलपे, जवान अभिजीत सुर्यवंशी यांची आई श्रीमती मनिषा सुर्यवंशी, मेजर सत्यजित शिंदे यांचे भाऊ व्यंकोजी शिंदे या देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे सेवा बजावित असताना शहीद झालेल्या स्टेशन ऑफिसर भगवान जाधव यांची पत्नी श्रीमती जाई जाधव, फायरमन श्रीकांत पाटील यांची पत्नी श्रीमती अंजनी पाटील, फायरमन दत्तात्रय खामकर यांचा भाऊ शिवाजी खामकर, फायरमन अशोक माने यांची बहिण भाग्यश्री डकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, टिना गवळी, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक मिलिंद कुलकर्णी, मुख्यलेखापाल संजय सरनाईक, मुख्य लेखाधिकारी सुनिल काटे, जल अभियंता हर्षजित घाटगे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उप-शहर अभियंता नारायण भोसले, एन.एस.पाटील, सतिष फप्पे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक अशोक यादव, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, नगरसचिव सुनिल बीद्रे, कर निर्धारक सुधाकर चल्लावाड, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, अग्निशमन दलाचे जवान, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थीनी, व्यायामशाळा प्रशिक्षक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.