Home शासकीय गांधी यांचे चित्र चलनी नोटेवरून हटवण्याची सरकारची योजना नाही : ना. पंकज चौधरी

गांधी यांचे चित्र चलनी नोटेवरून हटवण्याची सरकारची योजना नाही : ना. पंकज चौधरी

3 second read
0
0
39

no images were found

गांधी यांचे चित्र चलनी नोटेवरून हटवण्याची सरकारची योजना नाही : ना. पंकज चौधरी

नवी दिल्ली : भारतीय चलनी नोटांवर प्रतिष्ठित व्यक्ती, देवी-देवतांच्या आणि अगदी स्वातंत्र्यसैनिकांपासून प्राण्यांच्या प्रतिमा छापण्याचे प्रस्ताव आले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र चलनी नोटेवरून हटवण्याची सरकारची योजना नाही. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २५ अंतर्गत, बँक नोट डिझाइन, फॉर्म आणि सामग्रीच्या वापराबाबत आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशीनंतर सरकारकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे, त्यानंतरच बदल शक्य आहेत.
चलनी नोटेवर महात्मा गांधी यांच्यासह लक्ष्मी आणि भगवान गणेशाचे फोटो लावण्यात यावेत, अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. भारतीय चलनावर एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणेशाचे फोटो असावेत, अशी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले होते. लोकसभेत सरकारला विचारण्यात आले की, भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या फोटोंसह आणखी फोटो लावण्याच्या मागणीबाबत सरकारला काही विनंती करण्यात आली आहे का? अशा स्थितीत या मागणीबाबत सरकारची काय योजना आहे? या प्रश्नाला उत्तर देताना श्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, स्वातंत्र्यसैनिकांपासून प्रतिष्ठित व्यक्ती, देवी-देवता, प्राण्यांची छायाचित्रे चलनी नोटांवर छापण्याची मागणी करण्यात आली आहे.
आरबीआयच्या वेबसाइटनुसार, बँक नोटा आणि नाण्यांच्या डिझाइन आणि स्वरूपातील बदल भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि केंद्र सरकारद्वारे ठरवले जातात. चलनी नोटांच्या रचनेत कोणताही बदल करण्यासाठी RBI च्या केंद्रीय मंडळ आणि केंद्र सरकारची मान्यता घ्यावी लागते. नाण्यांच्या रचनेत बदल करणे हा केंद्र सरकारचा विशेषाधिकार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ चे कलम २२ RBI ला भारतात बँक नोट छापण्याचा अधिकार देते. कलम २५ नुसार, ‘बँकेच्या नोटांचे डिजाईन, रचना आणि साहित्य आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाने केलेल्या शिफारशी नंतर केंद्र सरकार मंजूर करते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…