
no images were found
मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर’ने पूर्ण केले ७०० एपिसोड्स!
डिसेंबर २०१९ मध्ये सुरू झालेली एण्ड टीव्हीवरील मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर’ने यशस्वीरित्या ७०० एपिसोड्स पूर्ण केले आहेत. मालिका तिच्या प्रबळ व्यक्तिरेखा, संवाद, सर्वसमावेशक पटकथा व लक्षवेधक कथानकामुळे प्रेक्षकांशी त्वरित संलग्न झाली आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. कलाकार भीमराव (अथर्व), रमाबाई (नारायणी महेश वर्णे), रामजी सकपाळ (जगन्नाथ निवंगुणे) आणि इतरांनी सेटवर एकत्र केक कापत या यशाला साजरे केले. या महत्वपूर्ण टप्प्याबाबत बोलताना तरूण भीमरावांची भूमिका साकारणारा अथर्व म्हणाला, “मालिकेचा वर्षानुवर्षे यशस्वी प्रवास आनंद साजरा करण्यासाठी पुरेसा आहे आणि ७०० एपिसोड्सचा टप्पा गाठणे अधिक उत्साहवर्धक आहे. प्रबळ सामाजिक ड्रामासह आंबेडकरांच्या अभूतपूर्व जीवनगाथेने हिंदी जीईसी प्रेक्षकांचे सुरूवातीपासूनच लक्ष वेधून घेतले आणि यासारख्या यशस्वी टप्प्यामधून आम्हाला प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहण्यास अधिक स्फूर्ती मिळते. तरूण भीमरावांच्या भूमिकेने मला अमाप प्रेम, मान्यता व प्रसिद्धी दिली आहे आणि ही भूमिका माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. मी या संधीसाठी आमच्या निर्मात्या स्मृती शिंदे आणि एण्ड टीव्ही टीमचे आभार मानतो. आतापर्यंतचा प्रवास अद्भुत राहिला आहे आणि पुढे देखील सुरूच राहण्याची मला खात्री आहे.’’
मालिकेच्या सुरूवातीपासून रामजी सकपाळची भूमिका साकारणारे जगन्नाथ निवंगुणे म्हणाले, “प्रत्येक नवीन सुवर्ण टप्पा कलाकारांना यशाची भावना देतो आणि आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत असल्याची पुष्टी देतो. बाबासाहेबांची अतूट चिकाटी, विकसित दृष्टिकोन व तत्वज्ञान सादर करण्याचा आमच्या टीमचा दृष्टिकोन आहे. त्यांचे हे गुण आजही देशभरातील भारतीयांना स्फूर्ती देतात. त्यांचे वडिल रामजी त्यांच्या महत्त्वाकांक्षी व दूरदर्शी मुलाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि मला मालिकेमध्ये ही महत्त्वाची भूमिका साकारण्याचा अभिमान वाटतो. ७०० एपिसोड्स पूर्ण करण्याच्या क्षणाला साजरे करण्यासोबत आम्हाला त्यामधून अधिक सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रेरणा मिळाली आहे.’’ रमाबाईची भूमिका साकारणाऱ्या नारायणी महेश वर्णे म्हणाल्या, “मालिका ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आम्बेडकर’चा प्रवास अद्भुत राहिला आहे आणि मला या यशस्वी मालिकेचा भाग असण्याचा आनंद होण्यासोबत अभिमान वाटतो. व्यक्तिश:, तसेच व्यावसायिकदृष्ट्या हा उत्तम अनुभव आहे. रमाबाई ही प्रबळ महिला आहे, जी सामाजिक अन्याय व अत्याचाराविरोधात आवाज उठवते. मला प्रेक्षकांना माझी भूमिका व मालिका आवडल्याचा आनंद होत आहे. माझा सर्वोत्तम अभिनय सादर करण्याच्या माझ्या प्रयत्नामध्ये मदत करण्यासाठी मी संपूर्ण टीम व कलाकारांचे आभार मानते. आम्ही प्रेक्षकांना आमच्या मालिकेकडे अधिक आकर्षित करत राहू आणि नवीन बेंचमार्क्स स्थापित करू.’’