Home आरोग्य मणिपाल हॉस्पिटल्‍सकडून बाणेर, पुणे येथे भारतातील सर्वात मोठे आरोग्‍यसेवा नेटवर्क

मणिपाल हॉस्पिटल्‍सकडून बाणेर, पुणे येथे भारतातील सर्वात मोठे आरोग्‍यसेवा नेटवर्क

1 min read
0
0
163

no images were found

मणिपाल हॉस्पिटल्‍सकडून बाणेर, पुणे येथे भारतातील सर्वात मोठे आरोग्‍यसेवा नेटवर्क

२५० बेड असलेल्‍या सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन

पुणे : पुणेकरांसाठी आपल्‍या आरोग्‍यसेवांमध्‍ये वाढ करत मणिपाल हॉस्पिटल्‍सने बाणेर येथे आपल्‍या नवीन सुविधेचे कार्यसंचालन सुरू केले आहे. हे हॉस्पिटल आकर्षक व उत्तमरित्‍या कार्यक्षम असण्‍यासोबत ३.५५ लाख चौरस एकर जमिनीवर स्थित आहे आणि शहरातील सर्वात मोठ्या खाजगी हॉस्पिटल्‍सपैकी एक आहे. नवीन बांधकाम करण्‍यात आलेले हॉस्पिटल मुख्‍य बाणेर – महाळुंगे रोड येथे सुलभपणे उपलब्‍ध आहे. मणिपाल हॉस्पिटल्‍स ग्रुपने भारतभरातील ४५ दशलक्ष रूग्‍णांचा उपचार केला आहे आणि मागील ६८ वर्षांहून अधिक काळापासून ते वैद्यकीय सर्वोत्तमतेसाठी ओळखले जातात. बाणेर हॉस्पिटल हे आता नेटवर्कमधील २८वे हॉस्पिटल आहे.

या नवीन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवांसाठी अत्‍याधुनिक पायाभूत सुविधांसह अत्‍याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञाने आहेत. या हॉस्पिटलमध्‍ये ६१ आयसीयू बेड्स, चार बोन मॅरो ट्रान्‍सप्‍लाण्‍ट सूट्स, सात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, सर्वात प्रगत इमेजिंग सर्विसेस्, अत्‍यंत अचूक रॅडिशन ऑन्‍कोलॉजी व कॅथ लॅब आहेत. हे हॉस्पिटल पुण्‍यातील मोठ्या प्रमाणातील लोकांच्‍या गरजांची पूर्तता करते, अनेक स्‍पेशालिटीज सेवा देते, ज्‍यामध्‍ये सात सेंटर ऑफ एक्‍सलन्‍सचा समावेश आहे, जसे न्‍यूरोसायन्‍सेस, ऑन्‍को सायन्‍सेस, कार्डियक सायन्‍सेस, रेनल सायन्‍सेस, गॅस्‍ट्रोएण्‍टेस्टिनल सायन्‍सेस व क्रिटीकल केअर. या नवीन हॉस्पिटलमध्‍ये रूग्‍णांना दर्जात्‍मक सुविधा देण्‍यासाठी विभिन्‍न स्‍पेशालिटींमधील विशेष पूर्ण-वेळ समर्पित कन्‍सल्‍टण्‍ट्स आहेत. मणिपाल हॉस्पिटल्‍स, बाणेरने मर्यादित सूट असलेल्‍या लाइफस्‍टाइल चेकअप पॅकेजची देखील घोषणा केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…