no images were found
काँग्रेसकडून ३० नेत्यांवर कारवाई
हिमाचल प्रदेशमधील निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर काँग्रेसकडून जवळजवळ ३० नेत्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. या नेत्यांची हकालपट्टी करण्याचे मुख्य कारण पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. या नेत्यांची यादी काँग्रेसने जाहीर केली असून यामधील बरेच नेते हे दीर्घकाळ पक्षात कार्यरत होते. काँग्रेसकडून जाहीर झालेल्या यादीत पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांचीही नावे आहेत. पक्षातून हकालपट्टी झालेल्या नेत्यांमध्ये संतोष डोगरा, धीरेंद्र सिंह चौहान, राम लाल नेवाली, महेश ठाकूर माडी, सुख राम नागरीक, श्याम शर्मा, सुरेंद्र सिंह मेघता, बसंत नेवाली, हितेंद्र चौहान यांसह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रतिभा सिंह यांच्या चौपाल ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या तक्रारीवरून या नेत्यांना बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त समजते. ‘पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग’ हे या सर्व नेत्यांच्या हकालपट्टीमागील कारण असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.