दिल्लीत विठू माऊलीचा गजर! ‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्या उत्साहात:पंढरपूर वारी’वरील माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग:गायिका शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाने दिल्लीकर मंत्रमुग्ध नवी दिल्ली, : राजधानीतील आजची संध्याकाळ विठू नामाच्या गजरात भक्ती रसात न्हाऊन निघाली. निमित्त होते महाराष्ट्र सदन, सरहद (पुणे) आणि महाराष्ट्र परिचय केंद्र (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझे माहेर पंढरी’ या विशेष भक्तीसंध्येचा कार्यक्रमाचे ! अत्यंत उत्साहात आणि …