ऊस वाहतूक वाहनांसाठी आरटीओ कडून सूचना कोल्हापूर, : ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांनी रस्ते सुरक्षेविषयी खबरदारी घेण्याकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ऊसाची वाहतूक ही प्रामुख्याने ट्रॅक्टर-ट्रेलर व बैलगाडी या वाहनातून प्रामुख्याने होत असते त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांनी रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या पुढच्या व मागील बाजूस दर्शनी ठिकाणी रिफ्लेक्टीव्ह टेप/बॅनर लावणे आवश्यक …