Home सामाजिक एसएमएफजी इंडिया क्रेडिटने “सर्वोत्तम सेवा” उपक्रमांतर्गत पशु विकास दिनाद्वारे 1.55 लाखांहून अधिक ग्रामीण जीवनांवर सकारात्मक प्रभाव साधला

एसएमएफजी इंडिया क्रेडिटने “सर्वोत्तम सेवा” उपक्रमांतर्गत पशु विकास दिनाद्वारे 1.55 लाखांहून अधिक ग्रामीण जीवनांवर सकारात्मक प्रभाव साधला

30 second read
0
0
33

no images were found

एसएमएफजी इंडिया क्रेडिटने “सर्वोत्तम सेवा” उपक्रमांतर्गत पशु विकास दिनाद्वारे 1.55 लाखांहून अधिक ग्रामीण जीवनांवर सकारात्मक प्रभाव साधला

 

 मुंबई, : भारतातील अग्रगण्य एनबीएफसींपैकी एक असलेल्या एसएमएफजी इंडिया क्रेडिटने 14 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या प्रमुख पशुधन कल्याण आणि ग्रामीण उपजीविका उपक्रमाचा 8 वा पशु विकास दिन (PVD) यशस्वीरीत्या पूर्ण केला. ‘सर्वोत्तम सेवा: पशु, परिवार आणि प्रगती’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाने पशुधनाचे आरोग्य, कुटुंबाचे कल्याण आणि शाश्वत प्रगती यांना बळकटी देत सर्वांगीण ग्रामीण विकासाबाबत संस्थेची बांधिलकी अधिक दृढ केली.

       2014 मध्ये सुरू करण्यात आलेला पशु विकास दिन हा उपक्रम पशुपालन करणाऱ्या व्यक्तींच्या अत्यावश्यक आरोग्य गरजांकडे लक्ष देतो आणि त्यांना मोफत पशुवैद्यकीय सेवा व तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देतो. गेल्या काही वर्षात हा उपक्रम देशातील सर्वात मोठ्या एकदिवसीय पशुधन कल्याण कार्यक्रमांपैकी एक म्हणून विकसित झाला आहे.

      एसएमएफजी इंडिया क्रेडिटने 1.55 लाखांहून अधिक जीवनांवर सकारात्मक प्रभाव साधला असून, यात सुमारे 1.4 लाख गुरांवर उपचार तसेच 14,000 हून अधिक लोकांना आरोग्यसेवा सहाय्य देण्यात आले. त्यायोगे 30,000 हून अधिक कुटुंबांना लाभ झाला. हा उपक्रम 16 राज्यांमध्ये आणि एसएमएफजी ग्रामशक्तीच्या 510 शाखांमध्ये राबविण्यात आला. त्यातून कंपनीची ग्रामीण भारतातील सखोल पोहोच दिसून येते.

      महाराष्ट्रात पशु विकास दिन 59 ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि 19,000 हून अधिक जनावरांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. त्याचा लाभ 5,200 हून अधिक कुटुंबांना झाला. प्रत्येक शिबिरात स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून मोफत तपासणी, जनावरांसाठी मोफत औषधांचे वितरण व लसीकरण, तसेच दूध देणाऱ्या पाळीव गुरांचे उत्पादन वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन अशा सेवा देण्यात आल्या.

          उपक्रमाच्या यशस्वी समारोपाबद्दल भाष्य करताना एसएमएफजी इंडिया क्रेडिटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी नारायणन म्हणाले, “‘सर्वोत्तम सेवा’ म्हणजे सेवेला तिच्या सर्वोच्च मानकांवर पोहोचवणे. अशा वेळी सह अनुभूती परिणामांशी जोडली जाते आणि हेतू वा उद्दिष्टाचे चीरकालीन बदलामध्ये रुपांतर होते. ग्रामीण भारतात पशुधनाचे आरोग्य, कुटुंबांची सुरक्षितता आणि आर्थिक प्रगती या सगळ्या गोष्टी परस्परांशी घट्ट जोडलेल्या आहेत. जनावरांची काळजी घेऊन, उपजीविका बळकट करून आणि समुदायाच्या स्वास्थ्याला पाठबळ देऊन पशु विकास दिन हा या परिसंस्थेला पोषक बनविण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. या उपक्रमाद्वारे शेती करणाऱ्या कुटुंबांना सक्षम करतील आणि तळागाळातून सर्वसमावेशक विकासाला चालना देतील असे शाश्वत परिणाम निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.”

       गेल्या काही वर्षात या उपक्रमाला त्याची पोहोच आणि परिणामकारकता याबद्दल अनेक राष्ट्रीय आणि जागतिक मान्यताप्राप्त सन्मान मिळाले आहेत. PVD ची 2015 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, 2018 मध्ये बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स, 2019 मध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि 2024 मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड्स युनियनमध्ये देशभरातील सर्वात मोठ्या एकदिवसीय पशुधन सेवा शिबिरांच्या आयोजनाबद्दल नोंद करण्यात आली. या परंपरेला पुढे नेत जेव्हा पशु विकास दिनाने भारतातील विविध ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आलेल्या ‘Largest Cattle Welfare Lesson’ साठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला तेव्हा एसएमएफजी इंडिया क्रेडिटने 2025 मध्ये एक महत्त्वपूर्ण जागतिक टप्पा गाठला. यातून ग्रामीण कल्याण, पशुधन देखभाल आणि समुदाय-आधारित व्यापक विकासासाठी कंपनीची दीर्घकालीन बांधिलकी अधिक दृढ झाली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…