Home सामाजिक चित्रपट हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम डॉ. कोठाडिया

चित्रपट हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम डॉ. कोठाडिया

6 second read
0
0
17

no images were found

चित्रपट हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम डॉ. कोठाडिया

कोल्हापूर,(प्रतिनिधी): चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे, असे मत जेष्ठ चित्रपट समिक्षक डॉ. अनमोल कोठाडिया यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापिठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागामध्ये “चित्रपट : व्यवसाय अध्ययनासाठी माध्यम” या विषयावरील कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन होते.

       डॉ. कोठाडिया पुढे म्हणाले, चित्रपटाच्या तांत्रिक अंगाचाही विचार करणे आवश्यक आहे. चित्रपट पाहताना आपण अभिनेते, अभिनेत्री यावर जास्त लक्ष देतो. परंतु, त्यातील कॅमेऱ्याचे अँगल, ध्वनी, प्रकाश योजना याबाबी सुद्धा महत्वाच्या असतात. शब्दाविनाही केवळ या माध्यमातून योग्य तो संदेश पोहचवता येतो. चित्रपट हे अशा प्रकारे एक वैश्विक भाषा असलेले संवाद माध्यम आहे. 

       अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी चित्रपटाचा आशय, विषय आणि त्यातील सामाजिक भान याबाबत आपण सजग राहिले पाहिजे, असे आवाहन केले. डॉ. अनमोल कोठाडिया यांनी यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली व संवाद साधला. डॉ. केदार मारुलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी एम. कॉम. व पीएच. डी. चे विद्यार्थी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…