सीएसआरद्वारे सहभागी संस्थांची ठिकाणे अंतीम लवकरच कामाला सुरुवात कोल्हापूर, : शहराच्या सौंदर्यीकरणासाठी सीएसआर च्या माध्यमातून विविध विकासकामांना गती देण्यासाठी आज महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली चौथी बैठक पार पडली. महानगरपालिकेच्या छत्रपती शाहू सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महापौरांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘माझं शहर, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत शहरातील प्रमुख चौक, आयलंड, दुभाजक, फुटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृहे, महापालिकेच्या शाळा …