‘लॅब टू फॅब्रिकेशन’ मंत्रासह संशोधनाला उद्योगाची जोड देण्याची गरज: ‘ॲल्युमिनियम मॅन’ भरत गीते कोल्हापूर,(प्रतिनिधी): केवळ प्रयोगशाळेतील चार भिंतींच्या आत संशोधन करून थांबणे आता उपयोगाचे नसून त्या संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष उत्पादनात आणि व्यापारात झाले पाहिजे. देशाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि विकसित बनवण्यासाठी ‘ॲकॅडेमिया आणि इंडस्ट्री’ यांच्यात थेट संवाद होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या तरुल इंडिया प्रा. लि. चे …