शिवाजी विद्यापीठाचा गोखले इन्स्टिट्यूसमवेत सामंजस्य करार कोल्हापूर (प्रतिनिधी): धोरणनिश्चितीच्या कार्यात सहभागाच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठातील संशोधक, अभ्यासकांना माहिती होण्याच्या दृष्टीने गोखले इन्स्टिट्यूटसमवेत होणारा सामंजस्य करार उपयुक्त ठरेल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केला. पुणे येथील नामांकित गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेसमवेत शिवाजी विद्यापीठाचा काल सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी …