
no images were found
रावबहादूर विचारे विद्यामंदिर शाळेच्या वर्गखोल्याचे आमदार ऋतूराज पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त 60 लाख अनुदानातून न्यू कनेरकरनगर परिसरातील महापालिकेच्या रावबहाद्दूर विचारे विद्यामंदिर शाळेच्या 4 वर्गखोल्याचे भूमिपूजन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. हा कार्यक्रम न्यू कणेरकरनगर, माजगांवकर नगर रोड येथील मारुती मंदिरजवळ घेण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी बोलताना महानगरपालिकेच्या शाळांच्या भौतिक सुविधेसाठी मी निधी उपलब्ध करून देऊ. महापालिकेच्या शाळेची प्रगती कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, प्रशासनाधिकारी शंकर यादव, उपशहर अभियंता एन एस पाटील, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, उषा सरदेसाई, किरण पाटील, शारीरिक शिक्षक निरीक्षक सचीन पांडव, शांतराम सुतार, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विनोदकुमार भोंग, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, विद्यार्थी, पालक व भागातील नागरिक यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसो कांबळे यांनी केले तर आभार सुधाकर सावंत यांनी मानले.