no images were found
शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन व व्याख्यान
कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट विभागाच्यावतीने भारताचे दिवंगत उपपंतप्रधान व सयुंक्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त दि. १२ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन मानव्यशास्त्र इमारतीमध्ये आयोजित केले आहे.
तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त ‘महाराष्ट्राची जडणघडण आणि यशवंतराव चव्हाण’ या विषयावर मास्वे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. अंबादास मोहिते, अमरावती यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित राहणार आहेत. सदर प्रदर्शनाचा तसेच व्याख्यानाचा लाभ सर्व विध्यार्थी व प्राध्यापक यांनी घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण अध्यासनाचे समन्वयक डॉ. उमेश गडेकर व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट चे प्रभारी संचालक डॉ. नितीन माळी यांनी केले आहे.