‘शिक्षणशास्त्र’च्या डॉ. नगिना माळी यांना सर फौंडेशनचा इनोव्हेशन पुरस्कार कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातील शिक्षक डॉ. नगिना सुभाष माळी यांना सोलापूर येथील सर फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारा इनोव्हेशन पुरस्कार जाहीर झाला आहे. मे २०२४मध्ये होणाऱ्या एज्युकेशनल इनोव्हेशन परिषदेत पुरस्कार वितरण होणार आहे. सोलापूर येथील ‘स्टेट इनोव्हेशन अॅन्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), महाराष्ट्र या संस्थेतर्फे ‘राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धा-२०२३’ आयोजित करण्यात आली होती. …