पत्रकारिता विद्यार्थ्यांची विद्यापीठात स्वच्छता कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने मंगळवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी अधिविभागाच्या परिसरात स्वच्छता केली. यावेळी वाढलेले गवत काढण्यात आले. सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा कचराही गोळा केला. विभागाच्या आसपास …