इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार १९४२’ च्या पोस्टरने वाढविली उत्सुकता कोल्हापूर-भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक धगधगत पर्व रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झालं आहे. ‘पत्री सरकार १९४२’ या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं वहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आणि या पोस्टरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढवली. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा प्रांतात १९४२ साली प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिशांना सळो की पळो …