Home मनोरंजन आगामी ‘तुझ्याकडे तुला मागणे’ मालिकेतून राकेश बापट येणार भेटीला

आगामी ‘तुझ्याकडे तुला मागणे’ मालिकेतून राकेश बापट येणार भेटीला

0 second read
0
0
15

no images were found

आगामी ‘तुझ्याकडे तुला मागणे’ मालिकेतून राकेश बापट येणार भेटीला

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता राकेश बापट स्टार प्रवाहच्या ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या नव्या मालिकेतून भेटीला येणार असून या मालिकेत राकेश अत्यंत प्रभावी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व साकारणार आहे. अभिमान सरदेसाई असं त्याच्या पात्राचं नाव असून अतिशय प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमा असलेला यशस्वी उद्योजक आणि राजकीय नेत्याच्य़ा भूमिकेत राकेश दिसणार आहे.

जनसेवेलाचाच आपलं व्रत मानणारा अभिमान आपल्या मुलाला वेळ देणारा हळवा बाप सुद्धा आहे. नात्यांना जपणारा आणि माणसं सांभाळणारा अभिमान नात्यांमध्ये कितीही ताण निर्माण झाला तरी आपल्या हसमुख स्वभावाने समोरच्याला समजावून सांगतो. तणावाच्या परिस्थितीतही संवादाची वाट शोधत नात्यांमधली दरी मिटवण्याची त्याची हातोटी त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते.

या भूमिकेविषयी सांगताना राकेश म्हणाला, ‘तुझ्याकडे तुला मागणे मालिकेतील अभिमान सरदेसाई हे पात्र माझ्यासाठी खूप खास आहे. अभिमान हा एकाच वेळी खंबीर, संवेदनशील आणि नात्यांना जपणारा माणूस आहे. विशेष म्हणजे, या मालिकेत मी पहिल्यांदाच एका गोड मुलाच्या बाबाची भूमिका साकारणार आहे, त्यामुळे या भूमिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आणि एका वडिलांचं आपल्या मुलासोबतचं नातं प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदा काम करतोय. त्यामुळे या नव्या प्रवासासाठी मी खूप उत्सुक असून प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद असाच लाभत राहो हीच इच्छा. तेव्हा नक्की पाहा नवी मालिका तुझ्याकडे तुला मागणे लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेध…