Home Uncategorized स्वच्छता व शिस्तीसाठी महापालिकेचे ‘उपद्रव शोध पथक’ सक्रिय

स्वच्छता व शिस्तीसाठी महापालिकेचे ‘उपद्रव शोध पथक’ सक्रिय

1 min read
0
0
12

no images were found

स्वच्छता व शिस्तीसाठी महापालिकेचे ‘उपद्रव शोध पथक’ सक्रिय : दोन प्रभाग समिती क्षेत्रासाठी एक याप्रमाणे एकूण दोन उपद्रव शोध पथके गठीत

कोल्हापूर, : शहरातील स्वच्छता, प्लास्टिक व थर्माकोल बंदी तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या विविध उपद्रवजनक बाबींना आळा घालण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने ‘उपद्रव शोध पथक’ (Nuisance Detection Squad – NDS) स्थापन केले आहे. शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या पथकाला देण्यात आले आहेत.

            महापालिकेच्या दोन प्रभाग समिती क्षेत्रासाठी एक याप्रमाणे एकूण दोन उपद्रव शोध पथके गठीत करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये निवृत्त सैन्य अधिकारी अथवा माजी सैनिक पथक प्रमुख म्हणून, तसेच माजी सैनिकांमधून नेमणूक केलेले दोन पथक सदस्य असे एकूण तीन जणांचे मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे.

            या पथकाकडून नेमून दिलेल्या प्रभाग क्षेत्रातील दुकाने, गाळे, हॉटेल्स, मॉल्स, हॉस्पिटल, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे तसेच सार्वजनिक जागांची नियमित प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे किंवा जाळणे, थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे, धूम्रपान करणे, ओला-सुका कचरा वर्गीकरण न करणे, जलस्त्रोतांच्या ठिकाणी जनावरे, वाहने किंवा कपडे धुणे, बांधकाम व पाडकामातील खरमाती कचरा (C&D Waste) इतरत्र टाकणे, विनापरवाना उघड्यावर व्यवसाय करणे तसेच अनधिकृत होर्डिंग व फलक उभारणे आदी प्रकार आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.

रु.300 पासून रु.25 हजारांपर्यंत दंडाची तरतूद

            महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्र. ५५४, दि. १० मार्च २०२५ नुसार निश्चित केलेल्या दरपत्रकाप्रमाणे विविध उपद्रवजनक कृत्यांसाठी  सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणाऱ्यांना 600 रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी कर्मचाऱ्यांमार्फत कचरा जाळल्यास 2000 रुपये दंड, ओला व सुका कचरा तसेच घरगुती घातक कचरा वर्गीकरण न केल्यास 500 रुपये दंड, जलस्त्रोत ठिकाणी जनावरे, वाहने व कपडे धुतल्यास 1000 रुपये दंड, खरमाती उघड्यावर टाकल्यास 600 रुपये दंड, मैला उघड्यावर टाकल्यास 600 रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 300 रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंका केल्यास 600 रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 600 रुपये दंड व सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यास 600 रुपये दंड करण्यात येणार आहे.

            तसेच महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल उत्पादने बंदी अधिसूचना, २०१८ चे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रथम गुन्ह्यास 50 हजार रुपये दंड, द्वितीय गुन्ह्यास 10 हजार रुपये दंड व तृतीय गुन्ह्यास 25 हजार रुपये दंड व 3 महिने कारावास

रु.५ हजार, द्वितीय गुन्ह्यास रु.१० हजार आणि तृतीय गुन्ह्यास रु.२५ हजार दंडासह तीन महिन्यांच्या कारावासाची तरतूद लागू करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

प्रत्येक कारवाईची होणार नोंद

            उपद्रव शोध पथकाकडून करण्यात येणाऱ्या प्रत्येक कारवाईची नोंद विहित नमुन्यातील पावती पुस्तिका अथवा इलेक्ट्रॉनिक हॅण्डहेल्ड डिव्हाइसद्वारे घेतली जाणार आहे. पथक प्रमुखांकडून दैनंदिन कारवाईचा अहवाल उपायुक्तांना, तर साप्ताहिक व मासिक एकत्रित अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यामुळे पथकाच्या कारवाईत पारदर्शकता व नियमित देखरेख राखली जाणार आहे.

            शहरातील स्वच्छता, सार्वजनिक शिस्त आणि नागरिकांसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने उपद्रव शोध पथक प्रभावीपणे कार्यरत राहणार आहे. नागरिक व व्यावसायिकांनी महापालिकेच्या नियमांचे काटेकोर पालन करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेध…