रंग माझा वेगळा मालिकेत येणार लीप; कथानक सरकरणार १४ वर्षांनी पुढे स्टार प्रवाहच्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नात्यांचे बदलते रंग पाहायला मिळणार आहेत. मालिकेत लीप येणार असून कथानक १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे. सध्या मालिकेत कार्तिकला साक्षीच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार ठरवत १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. न्यायालयाच्या निर्णयासमोर दीपाही हतबल झालीय. …