Home मनोरंजन झी टीव्हीवरील कलाकार देत आहेत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

झी टीव्हीवरील कलाकार देत आहेत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

11 second read
0
0
29

no images were found

झी टीव्हीवरील कलाकार देत आहेत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गुढीपाडवा हा महाराष्ट्रीय लोकांचा नवीन वर्षाचा सण म्हणून साजरा केला जातो. हिंदु संस्कृतीमध्ये हा दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस असून अन्य राज्यांमध्ये ह्या दिवसाला संवत्सर पाडवो, उगाडी, युगाडी, चेती चांद आणि नवरे अशा वेगवेगळ्‌या नावांनी ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये हा सण अतिशय वाजत गाजत आणि खूप प्रेमाने साजरा होतो. लोक आपली घरे सजवतात. घरी गुढी उभारतात, रांगोळ्‌या काढतात आणि अशा अनेक गोष्टी करतात. ह्या सणाच्या निमित्ताने झी टीव्हीवरील कलाकार ‘कैसे मुझे तुम मिल गये’ मधील किशोरी शहाणे आणि ‘कुमकुम भाग्य’मधील मुग्धा चाफेकर यांनी ह्या सणाच्या आपल्या आठवणी आणि ह्यावर्षी हा सण साजरा करण्याच्या आपल्या योजनांबद्दल सांगितले.

झी टीव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गये’मध्ये बबिताच्या भूमिकेतील किशोरी शहाणे म्हणाल्या, गुढीपाडवा ह्या सणाला माझ्या हृदयात खास स्थान आहे. ह्या दिवशी अनेक आठवणी मनात जाग्या होतात आणि पिढ्‌यान्‌ पिढ्‌या सुरू असलेला परंपरांचे जतन केले जाते. आमच्या घरी सुंदर गुढ्‌या उभारण्यापासून जवळच्या लोकांसोबत पारंपारिक गोडधोड पदार्थ खाण्यापर्यंत ह्या दिवशी प्रत्येक क्षण खास असतो. दरवर्षी मी ह्या दिवशी पुरणपोळी खाण्याची वाट पाहत असते. मी दररोज पुरणपोळी खाऊ सकते. ह्या खास दिवशी पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते. माझ्या आईने काढलेल्या सुंदर रांगोळ्‌या पाहण्याची आठवण माझ्यासाठी सर्वांत आवडती आहे. तेव्हा एकत्रपणाची ऊब असायची. गुढीपाडवा हा महाराष्ट्रीय लोकांसाठी केवळ एक सण नाही तर नवीन सुरूवातींचा संकेत आहे. आम्ही नवीन कपडे परिधान करतो आणि चांगल्या भविष्यासाठी परमेश्वराचे आशिर्वाद मागतो. हा गुढीपाडवा तुम्हां सर्वांच्या आयुष्यात प्रचंड आनंद आणि अनेक आशिर्वाद घेऊन येवो.

झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’मध्ये प्राचीच्या भूमिकेतील मुग्धा चाफेकर म्हणाली, ह्या दिवसाच्या माझ्या अनेक सुंदर आठवणी आहेत. आम्ही सकाळी लवकर उठून आमच्या घराच्या बाल्कनीमध्ये आमच्या घरच्या सदस्यांसोबत एकत्र येऊन गुढी उभारतो. मी महाराष्ट्रीय आहे आणि त्यामुळे सगळ्‌या मुंबईकरांप्रमाणे गुढीपाडवा हा माझ्यासाठीही सगळ्‌यात महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी माझी आई श्रीखंड पुरी आणि वरण भात असा मेन्यू बनवते. मला सण साजरे करायला आवडतात कारण त्या सगळ्‌या सणांना काहीतरी खोल आणि महत्त्वपूर्ण अर्थ असतो. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा मी हा सण माझ्या घरच्यांसोबत पारंपारिक पद्धतीने साजरा करणार आहे. मी आशा करते की हे नवीन वर्ष सर्वांच्या आयुष्यात खूप सारा आनंद घेऊन येवो.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…