
no images were found
शेतकऱ्यांसाठी नवीन सुवर्ण संधी
राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी पहिल्याच प्रयत्नात अनोखी चव व रंग असणाऱ्या ‘ब्लु जावा’ वाणाच्या केळीचे उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे. भारतात पहिल्यांदाच व्यावसायिक तत्वावर ह्या वाणाचे उत्पादन झाले असून पहिलीच तोडणी आज झाली. या वेळेस राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड च्या संस्थापिका डॉ. भाग्यश्री पी पाटील, तसेच फार्म ऑपरेशन मॅनेजर श्री. अमेय डी. पाटील, इशिता डी. मोहिते पाटील, सौ. राजलक्ष्मी डी पाटील व आसपासच्या गावांतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड तर्फे वितरित केलेल्या या वाणाचे पहिलेच उत्पादन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याचे रहिवासी असलेल्या इंजिनीअर व शेतकरी असलेले अभिजित पाटील यांच्या २ एकरांच्या जागेत घेण्यात आले असून फळांच्या पहिल्याच तोडणीस कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर शेतकरी बांधव देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ‘ब्लु जावा’ केळीची लागवड घेऊन इतर शेतकऱ्यांना आदर्श ठरलेले प्रगतशील शेतकरी अभिजित पाटील यांनी आजवर त्यांनी लाल केळी, ड्रॅगन फ्रुट तसेच सफरचंदाचेदेखील यशस्वी उत्पादन घेतले आहे. अभिजित पाटील यांच्या समवेत आणखीही बऱ्याच शेतकऱ्यांनी या केळीच्या वाणाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे हे विशेष. हे विक्रमी उत्पादन म्हणजे राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या पुण्यातील कंपनीने लागवडीपासून ते आता फळ तोडणीपर्यंत येणाऱ्या प्रत्येक पायरीवर वेळोवेळी शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शन केल्याचा परिणाम आहे.