संस्मरणीय असा वाढदिवस! एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये बिमलेशची भूमिका साकारणारी सपना सिकरवारचा ८ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. अभिनेत्री यंदा तिचा पती व प्रिय मुलीसोबत तिचा वाढदिवस साजरा करण्यास उत्सुक आहे. वाढदिवसाच्या प्लॅनबाबत सांगताना सपना सिकरवार म्हणाली, ‘‘माझे जीवन माझे पती त्रिलोक सिंग व मुलगी मान्या यांच्या भोवती गुंफलेले आहे. मी माझ्या जीवनातील या उत्साही व्यक्तींसोबत वाढदिवस साजरा करणार आहे. आम्ही जवळच्या मंदिरामध्ये जाऊन देवाचा आशीर्वाद …