no images were found
सुभेदार सिनेमाची टीम कोल्हापुरकरांच्या भेटीला
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेल्या स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीमध्ये अनेक शूरवीरांनी मोलाची साथ दिली. महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान या शूरवीरांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तानाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा. हा दैदिप्यमान इतिहास पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन आली आहे. १७ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर सुभेदार सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. याच निमित्ताने सुभेदार सिनेमातील कलाकारांनी कोल्हापुरकरांची भेट घेतली. रंकाळा तलावाजवळ उभारण्यात आलेल्या सिंहगडाच्या भव्यदिव्य प्रतिकृतीजवळ कलाकारांनी शिवगर्जना केली आणि सारा परिसर दुमदुमून गेला.
‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’ असं म्हणत तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्याची मोहीम हाती घेतली. शत्रूंच्या १५०० सैन्यासमोर अवघे ५०० मावळे हाताशी घेऊन तानाजी शेवटच्या श्वासापर्यंत लढले. शूरवीर तानाजींचा हा झंझावात सुभेदार सिनेमाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमात चिन्यम मांडलेकर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, मृण्मयी देशपांडे, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, अभिजीत श्वेतचंद्र असे दिग्गज कलाकार आहेत. मराठ्यांचा दैदिप्यमान पराक्रम अनुभवायचा असेल तर सुभेदार सिनेमा पहायलाच हवा. नक्की पाहा सुभेदार सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १७ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.