सुजीत पाटकर व भागीदारांची १२ कोटींची संपत्ती जप्त कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजीत पाटकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ईडीने कोविड-19 जंबो सेंटर्स घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे जवळचे ४६ वर्षीय सुजीत पाटकर आणि त्यांच्या भागीदारांची सुमारे १२ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुजीत पाटकर हे शिवसेना खासदार …