कोल्हापुरात महायुतीचा मेळावा कोल्हापूर(प्रतिनिधी) : राज्यातील बदलते राजकारण, नव्याने जुळलेली सत्तेची समीकरण आणि नेतेमंडळीच्या भूमिकेत झालेला बदल या साऱ्यांचे प्रतिबिंब कोल्हापुरात महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात उमटले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील घटक पक्षात एकोपा असल्याचे दर्शविण्यासाठी आयोजित मेळावा नेते मंडळींच्या शाब्दिक कोट्या, टोलेबाजींनी गाजली. स्थानिक आणि तालुका पातळीवरील राजकारणात एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणारे नेतेमंडळी या ठिकाणी एकमेकांच्या गळयात गळे घातल्याचे …