no images were found
अंबाई जलतरण तलावाच्या दुरुस्तीचा निधी नेमकं मुरला कुठ?
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :1977 साली रंकाळ्याच्यालगत शिवाजी पेठ ,फुलेवाडी, साने गुरुजी वसाहत, परिसरातील लोकांच्या उपयोगासाठी व सुविधासाठी महापालिकेने अंबाई जलतरण तलावाची स्थापना केली.. खर तर परिसरातील लोकांच्या हक्काचं फिरण्याचा आणि पोहण्याचे ठिकाण बनलेला हा महानगरपालिकेचा अंबाई जलतरण तलाव खरंतर महापालिकेच्या उत्पन्नाचा मोठं साधन बनलेलं असताना आता एक हिरव्यागार दूषित पाण्याने बनलेले डबक बनलेला आहे… अनावश्यक खर्च, तलावाच्या खर्चाकडे दुर्लक्ष महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची अनास्था संपूर्णपणे दुर्लक्ष यामुळे आज एक चांगला तलाव निव्वळ महापालिकेच्या प्रशासनाच्या अनास्थतेमुळे बंद पडण्याच्या अवस्थेत आलेला आहे.. या तलावाच्या गळतीसाठी मागच्या वर्षी सुमारे 20 लाख रुपये खर्च करून तलावाचं नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला . तेव्हाही प्रशासनाकडून प्रत्यक्ष अंबाई तलावाच्या सुधारणेवर खर्च झालेल्या कामाची वस्तुस्थितीची पाहणी न करता निव्वळ खिशात पाणी मुरवत ठेकेदारांना सादर केलेल्या बिलांवरती अधिकाऱ्यांच्या पटापटा सह्या करून सर्व प्रकारची बिल देखील अदा झाली … परंतु निव्वळ वर्षांपूर्वी 20 लाख रुपये खर्च केलेल्या तलावाची अशी दुरावस्था का झालीय??असे विचारण्याचा धाडस अधिकाऱ्यांना व निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला विचारण्याचं धाडस महापालिकेच्या प्रशासकांनी केलेले नाही हे कोल्हापूरच्या जनतेचे दुर्दैवच म्हणावं लागेल.. 15 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालणारा हा जलतरण तलाव मध्ये आज फक्त सहा कर्मचारी काम करतात.. तर जमिनीतून मुरणाऱ्या पाण्यामुळे व अधिकाऱ्यांच्या खिशात जाणाऱ्या बिलांच्या टक्केवारीमुळे या तलावातील पाणी दिवसाला सहा ते सात फुटान पाणी कमी होऊन त्यावर पाण्यावरती हिरवा तवंग येवुन आजही नियमित पोहायला या नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा एक अमानुष प्रकार महापालिका प्रशासन करत आहे… लोकांच्यासाठी व लोकांच्या करिता या ब्रीदवाक्यानुसार चाललेल्या महापालिकेने या अंबाई तलावाच्या अनास्थेकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेलं असून अंबाई तलावाच्या नूतनीकरणे संबंधी अनेकदा निवेदन आंदोलन करून सुद्धा व नियमित पोहणाऱ्या लोकांनी तक्रारी करून सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेला आहे ..फिल्टरचा प्लांट सुद्धा पूर्णपणे जुना व बंद झाला असून तो बदलण्याची गरज आहे.. फिल्टर ऑपरेटर नाही महापालिकेच्या या टॅंकला पहारेकरी नाही पुरेसे कर्मचारी नाही . आणी पोहण्यासाठी चांगल्या दर्जाचे पाणी नाही .. अशी कलापूर असणाऱ्या राजश्री शाहूंच्या कोल्हापुरातल्या महापालिकेच्या अंबाई जलतरण तलावाची अवस्था झालेली आहे ..अशा विदारक अवस्थेमध्ये अंबाई जलतरण तलाव आज येणाऱ्या मे महिन्याच्या सुट्टी मध्ये मिळणार हक्कच उत्पन्न याकडे महापालिका प्रशासनांना पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा दिसून येते. खरंतर मागच्याच वर्षी वीस लाख रुपये सदरचे काम इतक्या निकृष्ट दर्जाचे का झालं हे दोन्ही प्रश्न महापालिका प्रशासनासमोर अनुत्तरीत आहेत. आणि जनता अंबाबाई जलतरण तलावाच्या पुनर्जीवनीच्या प्रतीक्षेत आहे ..खरंतर सध्या या परिसरात दुसरा तलाव नसल्याने व माफक दर असल्याने महापालिकेचा जलतरण तलाव ही लोकांची गरज बनलेली आहे .सबब कोल्हापुरातील हा महानगरपालिकेचा तलाव महापालिकेने त्वरित दुरुस्ती करून फिल्टर प्लांट नवीन बसवावा व योग्य त्या सुव्यवस्थेसह कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून तलाव सुस्थितीत जर आणला नाही तर महानगरपालिकेविरुद्ध प्रचंड जनक्षोभाला सामोरे जावे लागेल . महापालिकेच्या तसेच शासनाच्या मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारीला सोकावलल्या व प्रत्येक गोष्टीवर डल्ला मारण्यात तज्ञ असणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाला या तलावाकडे त्वरित लक्ष द्यावं अन्यथा शिवसेना याप्रसंगी जनआंदोलन करेल याची नोंद घ्यावी. अशी निवेदन यावेळी महापालिका प्रशासनाला देण्यात आले.
यावेळी संजय पवार,विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, अवधूत साळोखे,हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, समरजीत जगदाळे,अनिकेत ठोंबरे, रघुनंदन भावे , प्रतिज्ञा उत्तुरे,दिनेश परमार, सुनील कानूरकर, स्मिता सावंत, माधुरी जाधव, मंजित माने,दिलीप देसाई, किरण पडवळ, दत्ताजी टिपूगडे, महेश उत्तुरे, आरती गोंदकर,अनिता ठोंबरे,गीता गायकवाड, शशिकांत बिडकर,वर्षा पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.