गोकुळ निवडणुकीसाठी शाहू समविचारी आघाडी आज ठराव दाखल करणार कोल्हापूर(प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी छत्रपती शाहू समविचारी आघाडीच्या वतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून जिल्ह्यातील सभासद संस्था प्रतिनिधींच्या नावांचे ठराव आज मंगळवारी सकाळी १०.०० वाजता मोठ्या शक्तिप्रदर्शनाने दाखल करण्यात येणार आहेत. ठरावधारक धैर्यप्रसाद हॉल येथे एकत्र जमून सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालय येथे जाऊन …