कमलाकरच्या यशाला आता नवी भरारी : दादांच्या पाठबळाने परदेशवारी कोल्हापूर(प्रतिनिधी ): कोल्हापुरातील राजेंद्र नगर मध्ये राहणारा कमलाकर कराळे हा एक दिव्यांग खेळाडू. जन्मजात व्यंगावर मात करत कोल्हापूरच्या या सुपुत्राने ऍथलेटिक्स, पॉवर लिफ्टिंग ,व्हॉलीबॉल सीटिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत भारताचे नाव उंचावले आहे. नुकतीच त्याची मलेशिया आणि नेपाळ इथं होणाऱ्या व्हीलचेअर क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत निवड झाली. …