राधानगरी रोडवरील सिटी डेंटल ॲण्ड एम्पीलिमेंट सेंटरला पंचवीस हजाराचा दंड कोल्हापूर ( प्रतिनिधी):-सानेगुरुजी वसाहत, राधानगरी रोडवरील सिटी डेंटल ॲण्ड एम्पीलिमेंट सेंटरने त्यांचे हॉस्पिटलमधील जैव वैद्यकिय कचरा उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना आज रु.25 हजाराचा दंड करण्यात आला. सदरची कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडील आरोग्य निरीक्षक श्रीराज होळकर, मुकादम योगेश बनसोडे, अमय गर्दनकर यांनी केली. सहाय्यक आयुक्त …