no images were found
सिप्लाकडून लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेहासाठी ‘युरपीक®’ (टिर्झेपॅटाइड) लाँच
देशातील वाढत्या लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेह या गंभीर आरोग्य समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून सिप्ला लिमिटेडने ‘युरपीक®’ (टिर्झेपॅटाइड) हे आठवड्यातून एकदा दिले जाणारे इंजेक्शन स्वरूपातील औषध भारतात लाँच केले आहे. हे औषध केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच उपलब्ध असेल.
युरपीक® हे GIP (ग्लुकोज-डिपेंडेंट इन्सुलिनोट्रॉपिक पॉलीपेप्टाइड) आणि GLP-1 (ग्लुकागॉन-सदृश पेप्टाइड-1) या दोन्ही रिसेप्टर्सवर कार्य करणारे पहिले आणि एकमेव ड्युअल अॅगोनिस्ट औषध आहे. हे औषध आहार आणि व्यायामासोबत पूरक उपचार म्हणून टाइप 2 मधुमेह तसेच दीर्घकालीन वजन नियंत्रणासाठी वापरण्यात येते.
युरपीक® हे क्विकपेन® डिव्हाइस स्वरूपात 2.5 मिग्रॅ, 5 मिग्रॅ, 7.5 मिग्रॅ, 10 मिग्रॅ, 12.5 मिग्रॅ आणि 15 मिग्रॅ अशा सहा डोसमध्ये उपलब्ध असणार आहे. यामुळे रुग्णांना अचूक, सोयीस्कर आणि सुरक्षित डोस घेणे शक्य होणार आहे.
लिली कंपनीकडून युरपीक® चे उत्पादन व पुरवठा केला जाणार असून, भारतात वितरण आणि प्रचाराची जबाबदारी सिप्लाकडे असेल. या औषधाची किंमत मोंजारो® या ब्रँडसारखीच असेल.
सिप्ला देशभर, मेट्रो शहरांबरोबरच इतर भागांमध्येही युरपीक® उपलब्ध करून देणार आहे. यासोबतच रुग्णांसाठी डोस ठरवणे, स्वतः इंजेक्शन घेण्याचे तंत्र आणि सुरक्षित वापर याबाबत व्यापक शिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे.या उपक्रमातून सिप्ला रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार सुरक्षित आणि प्रभावी उपचार घेण्यास सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे.