Home मनोरंजन खास एअरबीएनबी अनुभवामुळे लोल्लापालूझा इंडिया २०२६चा आनंद द्विगुणित

खास एअरबीएनबी अनुभवामुळे लोल्लापालूझा इंडिया २०२६चा आनंद द्विगुणित

6 second read
0
0
54

no images were found

खास एअरबीएनबी अनुभवामुळे लोल्लापालूझा इंडिया २०२६चा आनंद द्विगुणित

कोल्हापूर, :जागतिक दर्जाच्या संगीत महोत्सवाचा अनुभव अधिक खास बनवण्यासाठी एअरबीएनबीने लोल्लापालूझा इंडिया २०२६ सोबत पहिली जागतिक लाईव्ह म्युझिक भागीदारी जाहीर केली आहे. या उपक्रमाअंतर्गत संगीतप्रेमींना २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या महोत्सवात अनोखे आणि अविस्मरणीय अनुभव मिळणार आहेत.

       या विशेष एअरबीएनबी अनुभवांमध्ये बॅकस्टेज टूर, कलाकारांसोबत सर्जनशील चर्चासत्रे तसेच पडद्यामागील घडामोडींचा थेट अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यटन, संस्कृती आणि सर्जनशीलतेद्वारे लोकांना एकत्र आणण्याच्या एअरबीएनबीच्या उद्दिष्टाला या उपक्रमामुळे नवे बळ मिळाले आहे.

अंकुर तिवारींसोबत खास बॅकस्टेज अनुभव

ख्यातनाम गायक-गीतकार अंकुर तिवारी यांच्या सर्जनशील विश्वात प्रवेश करण्याची संधी या अनुभवातून मिळणार आहे. यामध्ये चाहत्यांना दुर्मिळ बॅकस्टेज प्रवेश, शोपूर्व तयारीचा अनुभव आणि लोल्लापालूझा इंडिया आफ्टरशोचे आमंत्रण दिले जाणार आहे. हा अनुभव २४ जानेवारी २०२६ रोजी उपलब्ध असेल.

ओएएफएफ आणि सवेरासोबत स्टेजच्या पलीकडे

लोकप्रिय संगीतकार-निर्माता जोडी ओएएफएफ आणि सवेरा यांच्यासोबत संगीत कसे तयार होते आणि स्टेजवर कसे साकारते याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. स्टुडिओपासून स्टेजपर्यंतचा प्रवास पाहण्याची ही दुर्मिळ संधी २५ जानेवारी २०२६ रोजी उपलब्ध असेल.

राशी संघवीसोबत पडद्यामागील जग

लोल्लापालूझा इंडिया इनसाइडर राशी संघवी यांच्यासोबत महोत्सवाच्या निर्मितीमागील बारकावे, लाईव्ह प्रोडक्शन आणि जागतिक भागीदारीची माहिती मिळणार आहे. हा अनुभव २४ जानेवारी २०२६ रोजी घेता येईल.

बुकमायशोचे लाईव्ह इव्हेंट्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी नमन पुगलिया म्हणाले, “लोल्लापालूझा इंडिया हा केवळ संगीत महोत्सव नसून तो संस्कृती आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. एअरबीएनबीसोबतची ही भागीदारी चाहत्यांना महोत्सवाची वेगळी आणि आतली बाजू पाहण्याची संधी देते.”

बुकिंगची माहिती

या खास अनुभवांसाठी बुकिंग १५ डिसेंबरपासून सुरू झाले आहे

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर अनुभव उपलब्ध असतील.

मुंबई ये-जा आणि निवासाची व्यवस्था सहभागींची स्वतःची असेल.

      लाँग वीकेंडदरम्यान होणाऱ्या या महोत्सवामुळे एअरबीएनबी मुंबईतील उत्साही परिसरात राहण्याचे विविध पर्यायही उपलब्ध करून देणार असून, संगीतप्रेमींना लोल्लापालूझा इंडिया २०२६चा संपूर्ण अनुभव घेता येणार.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …