Home आरोग्य महानगरपालिकेच्या 53 वा वर्धापन दिनानिमित्त शनिवारी ते सोमवार पर्यत खाद्य महोत्सव

महानगरपालिकेच्या 53 वा वर्धापन दिनानिमित्त शनिवारी ते सोमवार पर्यत खाद्य महोत्सव

14 second read
0
0
26

no images were found

महानगरपालिकेच्या 53 वा वर्धापन दिनानिमित्त शनिवारी ते सोमवार पर्यत खाद्य महोत्सव

सोमवारी महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबीर

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती तसेच एन.एम.एल.यु. विभागामार्फत शनिवार दि.13 ते सोमवार दि.15 डिसेंबर 2025 दरम्यान भव्य खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ताराबाई पार्क जवळील सासने मैदान येथे हा महोत्सव दुपारी. 3.00 ते रात्रौ 9.30 वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

            या खाद्य महोत्सवात शहरातील विविध महिला बचत गटांचा सहभाग असून तब्बल 50 प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल्स येथे उभारले जाणार आहेत. खवय्यांसाठी खास व्हेज व नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे रुचकर खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत. यासोबतच या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पॉट गेम, फनी गेम आदींनी सजलेले मनोरंजन कार्यक्रमही नागरीकांसाठी आयोजित केले आहेत. तरी या खाद्य महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका महिला व बालकल्याण व एन.एम.एल.यु. विभागामार्फत करण्यात आले आहे.

            दरम्यान महापालिकेच्या 53 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोमवार, दि.15 डिसेंबर 2025 रोजी महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते या शिबीराचा शुभारंभ होणार असून हे शिबीर महापालिकेच्या मुख्य इमारतीत कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात आयोजित करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…