Home आरोग्य निक जोनास आणि प्रियंका चोप्रा जोनास यांनी बियॉन्ड टाईप 1चा पहिला भारतीय उपक्रम # दबियॉन्डटाइप केला सुरू

निक जोनास आणि प्रियंका चोप्रा जोनास यांनी बियॉन्ड टाईप 1चा पहिला भारतीय उपक्रम # दबियॉन्डटाइप केला सुरू

12 second read
0
0
34

no images were found

निक जोनास आणि प्रियंका चोप्रा जोनास यांनी बियॉन्ड टाईप 1चा पहिला भारतीय उपक्रम # दबियॉन्डटाइप केला सुरू

नवी दिल्ली,: – बियॉन्ड टाईप 1 चे को-फ़ाउंडर निक जोनास, बोर्ड मेंबर प्रियंका चोप्रा जोनास आणि बियॉन्ड टाईप 1 संस्थेने आज भारतात #दबियॉन्डटाइप ही मोहीम सुरू केली. निक जोनास यांना 13 वर्षांचे असताना टाइप 1 डायबिटीजचे निदान झाले होते आणि त्यांनी 10 वर्षांपूर्वी बियॉन्ड टाईप1 ही नॉन-प्रॉफिट संस्था स्थापन केली. #दबियॉन्डटाइप ही त्यांची भारतातील पहिली मोहीम असून, यात टाइप 1 डायबिटीज असलेल्या लोकांचे वास्तविक जीवनातील अनुभव मांडले गेले आहे. या अनुभवांमधून लोकांमध्ये असलेले गैरसमज आणि कलंक दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि डायबिटीज कोणाच्याही क्षमतेला मर्यादा घालत नाही हे दाखवले आहे. डायबिटीजबद्दल जागरूकता वाढवणे, समाजातील कलंक कमी करणे आणि स्थानिक पातळीवर महत्त्वाचे काम करणाऱ्या संस्थांना मदत करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

भारतामध्ये टाइप 1 डायबिटीज असलेल्या तरुणांची संख्या जास्त आहे आणि एकूण डायबिटीज रुग्णसंख्येमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही या आजाराबद्दल जागरूकता कमी आहे आणि लोकांमध्ये गैरसमज अजूनही आहेत.

बियॉन्ड टाईप मोहिमेत अशा अनेक लोकांच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या आहेत जे टाइप 1 डायबिटीज असूनही आपले जीवन आत्मविश्वासाने जगत आहेत आणि आपली स्वप्ने पूर्ण करत आहेत. ते न थांबणारे, निर्धाराने पुढे जाणारे, प्रेरणादायी लोक आहेत ज्यांनी हे सिद्ध केले आहे की टाइप 1 डायबिटीज एखाद्या व्यक्तीच्या क्षमतेला मर्यादा घालत नाही.

“भारतामध्ये टाइप 1 डायबिटीज असलेले लोक खूप प्रेरणादायी आहेत, पण त्यांचे अनुभव फारसे ऐकायला मिळत नाहीत,” प्रियंका चोप्रा जोनास म्हणाल्या. “मी माझ्या पती निकमुळे या समुदायाबद्दल अधिक चांगले समजून घेऊ शकले आणि टाइप 1 डायबिटीज असलेले लोक दररोज किती ताकद आणि धैर्याने भरभराटीला येतात हे मी पाहिले आहे. बियॉन्ड टाईप मोहिमेत काही अशा कथा मांडल्या आहेत, ज्यातून दिसते की योग्य उपचार आणि मदत मिळाल्यास, डायबिटीज त्यांना थांबवू शकत नाही किंवा त्यांच्या क्षमतेवर बंधन आणत नाही.”

निक जोनास म्हणाले “माझ्या स्वतःच्या अनुभवातून मला माहीत आहे की की योग्य उपचार आणि योग्य साधने आणि मदत मिळाली तर डायबिटीज तुमच्या क्षमतेवर मर्यादा आणत नाही. भारतात जागरूकता कमी आहे आणि गैरसमज जास्त आहे, म्हणून आम्ही सर्वांना योग्य माहिती आणि आधार मिळण्यास मदत करण्यासाठी भारतात आलो आहोत. माझ्या कुटुंबामुळे मला भारताबद्दल खूप प्रेम वाटू लागले आहे आणि इथे होणारी प्रगती पाहून मला अभिमान वाटतो.”

# दबियॉन्डटाइप मोहिमेची सुरुवात Instagram in a joint post from Priyanka Chopra Jonas, Nick Jonas and Beyond Type 1 पोस्टद्वारे झाली, ज्यांची एकूण पोहोच 1.35 मिलियनपेक्षा जास्त आहे. या मोहिमेत अशा लोकांच्या कथा मांडल्या आहेत ज्या दाखवतात की डायबिटीज त्यांना आपले स्वप्न पूर्ण करण्यापासून थांबवत नाही. यात ट्रायथलीट लेफ्टनंट कर्नल कुमार गौरव; 13 वर्षांची कराटे चॅम्पियन मेहरिन राणा, पेस्ट्री शेफ निशांत अमीन, टॉय डिज़ाइनर आणि उद्योजिका श्रेय जैन, डांसर आणि अभिनेत्री इंदू थंपी, आणि भाजी विक्रेता व मॅरेथॉन धावपटू हरिचंद्रन पोनुसामी यांचा समावेश आहे. मेहरिन म्हणते, “डायबिटीज हा माझ्या आयुष्याचा फक्त एक भाग आहे, अडथळा नाही. टाइप 1 असलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात कुठलाही मर्यादा न ठेवता सर्व काही करू शकते.”

टाइप 1 डायबिटीज हा ऑटोइम्यून आजार आहे. तो जीवनशैली, वय किंवा चुकीच्या सवयींमुळे होत नाही. तरीसुद्धा समाजातील गैरसमज आणि कलंकामुळे अनेक कुटुंबे सुरुवातीची लक्षणे ओळखू शकत नाहीत — जसे की खूप तहान लागणे, वारंवार लघवी लागणे, खूप थकवा येणे आणि अचानक वजन कमी होणे. ही लक्षणे लक्षात आली नाहीत तर निदान उशिरा होते. # दबियॉन्डटाइप मोहिमेमध्ये लोकांच्या खऱ्या जीवनातील प्रेरणादायी कथा सांगून हा कलंक कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यामुळे लोकांमध्ये लवकर जागरूकता आणि समज निर्माण होईल. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…