Home मनोरंजन सुंदर नऊवारी साडी आणि चमचमती नथ: सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत सुंबुल तौकीर खान पारंपरिक मराठमोळ्या नववधूच्या रूपात         

सुंदर नऊवारी साडी आणि चमचमती नथ: सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत सुंबुल तौकीर खान पारंपरिक मराठमोळ्या नववधूच्या रूपात         

22 second read
0
0
28

no images were found

सुंदर नऊवारी साडी आणि चमचमती नथ: सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत सुंबुल तौकीर खान पारंपरिक मराठमोळ्या नववधूच्या रूपात                         

मुंबई,: सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ ही मालिका आता एका अत्यंत भावनिक आणि निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. आपल्या साखरपुड्याच्याच दिवशी विराट (रजत वर्मा)च्या नाहीशा होण्याने हातबुद्ध झालेली अन्विता (सुंबुल तौकीर खान) एक जीवन पालटून टाकणारा निर्णय घेते. आपल्या हरवलेल्या प्रेमापेक्षा जबाबदारीला जास्त महत्त्व देऊन ती संजय (ऋषी सक्सेना) या आपल्या लहानपणीच्या मित्राशी विवाहबद्ध व्हायचे ठरवते. हा केवळ तिच्या प्रवासातीलच नाही, तर मालिकेतील मोठा टर्निंग पॉइंट आहे.

       आता विवाह सोहळ्याचे कथानक उलगडू लागले आहे. अन्विताने आपल्या मराठमोळ्या वधू अवताराची पहिली झलक प्रेक्षकांना दिली आहे. सोनेरी नक्षीकाम केलेली हिरवीगार नऊवारी साडी आणि त्यावर आमसुली रंगाचे ब्लाऊज परिधान केलेल्या सुंबुलच्या या रुपातून परंपरा, तिचा ठहराव आणि लवचिकता स्पष्ट प्रतिबिंबित होत आहे. तिच्या कपाळावर नाजुक मुंडावळ्या बांधल्या आहेत, नाकात सुंदर नथ आहे आणि एकाखाली एक असे सोन्याचे हार तिने घातले आहेत. खोपा घालून त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला आहे. हातावर मेंदी आणि हलकासा मेकअप यामुळे ती एक सुंदर वधू दिसत आहे.

        आपल्या लुकविषयी आणि हा क्षण साकारण्याच्या अनुभवाविषयी सुंबुल म्हणते, “सर्वसामान्यपणे मालिकांमधील नायिका आपल्या पडद्यावरील लग्नात लहेंगा परिधान करतात, पण मराठमोळा वधू पोशाख परिधान करण्याचा अनुभव माझ्यासाठी अगदीच नवा होता. मी या आधी नऊवार नेसले आहे, पण एक वधू म्हणून नऊवारी साडी नेसताना मी भावनावेग अनुभवला. जेव्हा माझी वेशभूषा पूर्ण झाली आणि ती नथ मी घातली, तेव्हा माझ्यात काहीतरी हलले. पहिल्यापासून मराठी वधू ज्या शालीनतेने नटतात, त्याचे मला कौतुक वाटायचे. हिरवा चुडा, नथ, मुंडावळ्या हे सगळे कसे शालीन दिसते. आता मी याच वेशभूषेने आणि दगिन्यांनी सजले आहे. अन्विता काय अनुभवत असेल हे मी देखील शूटिंग करताना अनुभवले- ते प्रेम, आशा आणि ती हुरहूर… या सगळ्यामुळे मला खरोखरच तिच्या जगात पाऊल टाकत असल्यासारखे वाटले. आजवरच्या माझ्या काही संस्मरणीय लुक्सपैकी हा एक आहे. अन्विताला तिच्या या टप्प्यावर प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळत आहे, ते पाहून मी भारावले आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …