Home Uncategorized न्यायव्यवस्था, सैन्य आणि शिक्षण व्यवस्थेवरील डाव्यांचे आक्रमण उधळून लावा! – अधिवक्ता सत्येंद्र मुळे, मुंबई उच्च न्यायालय

न्यायव्यवस्था, सैन्य आणि शिक्षण व्यवस्थेवरील डाव्यांचे आक्रमण उधळून लावा! – अधिवक्ता सत्येंद्र मुळे, मुंबई उच्च न्यायालय

3 second read
0
0
12

no images were found

न्यायव्यवस्था, सैन्य आणि शिक्षण व्यवस्थेवरील डाव्यांचे आक्रमण उधळून लावा! – अधिवक्ता सत्येंद्र मुळे, मुंबई उच्च न्यायालय

पुणे: – लोकशाहीची मूळ संकल्पना हिंदु धर्मानेच जगाला दिली आहे. भारत हा मुक्त विचारांचा देश असतांनाही, डावी विचारधारा देशाच्या प्रगतीत सातत्याने अडथळे आणत आहे. ‘अवॉर्ड वापसी गँग’, ‘नर्मदा बचाव आंदोलन’ आणि ‘शेतकरी आंदोलनां’च्या आडून न्यायव्यवस्था, सैन्य, प्रसारमाध्यमे आणि शिक्षण व्यवस्था या लोकशाहीच्या मुख्य स्तंभांवर जाणीवपूर्वक आक्रमणे केली जात आहेत. हे धोकादायक षड्यंत्र उधळून लावण्यासाठी युवा पिढीला खऱ्या इतिहासाची जाणीव करून देणे आणि वैचारिक पातळीवर सक्षम करणे गरजेचे आहे. यापुढील काळात केवळ सरकारवर अवलंबून न राहता देव, देश आणि धर्म रक्षणासाठी तरुणांनी आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता सत्येंद्र मुळे यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने २० ऑगस्ट रोजी पुणे येथील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील गणेश सभागृहात ‘सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद?’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी ३०० हून अधिक लोक उपस्थित होते. कार्यक्रमात सामाजिक व राजकीय विश्लेषक श्री. सर्वेश मेहंदळे यांनी वक्त्यांशी संवाद साधत अर्बन नक्षलवादाची विविध अंगे उलगडून दाखवली.

*‘दिमागी नक्षलवाद’ हा भारताला झालेला वैचारिक कर्करोग; शस्त्रक्रिया आवश्यक!* – अभय वर्तक, सनातन संस्था

या प्रसंगी बोलताना सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक म्हणाले, ‘‘पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी ‘दिमागी नक्षलवादापासून सावध राहा’ असा इशारा देऊन देशाला अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. साम्यवाद आणि अर्बन नक्षलवाद हा भारतीयत्वाला झालेला मानसिक कर्करोग आहे. हा आजार दूर करण्यासाठी वैचारिक व बौद्धिक पातळीवर शस्त्रकर्म करावे लागेल. ‘जेन-जी’ पिढीसमोर साम्यवाद्यांचा खरा चेहरा आणून दाखवणे आणि समाजवाद्यांचा दुटप्पीपणा उघड करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.’’

‘सीजेपी’ आंदोलनामागे परकीय निधी आणि डाव्या संघटनांचे षड्यंत्र! – श्री. सर्वेश मेहंदळे

या वेळी सामाजिक व राजकीय विश्लेषक श्री. सर्वेश मेहंदळे म्हणाले, ‘‘सोनम वांगचूक यांच्या नावावर ३०० नव्हे, तर केवळ एकच पेटंट आहे; त्यांच्या ‘सेकमोल’ या संस्थेचा ‘एफसीआरए’ (FCRA) परवाना सरकारने रद्द केला आहे. सीजेपी आंदोलनाला ‘आयसा’ (AISA), ‘एसएफआय’ (SFI) आणि काही ख्रिश्चन मिशनरी संघटनांनी पाठिंबा दिला असून परकीय निधीविषयक कायद्यातील कडक बदलांना विरोध करणे हाच ‘सीजेपी’ आंदोलनामागे मुख्य उद्देश होता.’’

१४ हजाराहून अधिक निरपराधांच्या हत्यांवर पुरोगामी गप्प का? – अधि. वीरेंद्र इचलकरंजीकर

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्हिडियो संदेशाद्वारे भूमिका मांडली. ते म्हणाले की, गांधी हत्येनंतर देशात केवळ चार पुरोगाम्यांच्या हत्या झाल्याचा आभास निर्माण केला जातो; परंतु नक्षलवाद्यांनी मारलेल्या १४ हजारांहून अधिक निरपराधांवर हे अर्बन नक्षलवादी मौन बाळगतात. हे षड्यंत्र उधळण्यासाठी सर्वांनी कृतीशील झाले पाहिजे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

गुलकी जोशी दिसणार पारंपरिक महाराष्ट्रीयन अवतारात

गुलकी जोशी दिसणार पारंपरिक महाराष्ट्रीयन अवतारात सोनी सबचं यादें आपल्या अनो…