वीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यू बीड : बीडच्या काळेगाव घाट गाव परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. एकीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाचा बीड जिल्ह्यासह राज्यात उत्सव सुरू असताना दुसरीकडे शेतकरी कुटुंबातील महिलेवर काळाने घाला घातला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारलेली होती. त्यानंतर बीड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये वीज कोसळून ३५ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. …