गोंदिया : माजी राज्यमंत्री भरतभाऊ बहेकार यांचे निधन गोंदिया : महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा निवासी भरतभाऊ बहेकार (८२) यांचे मंगळवारी रात्री गोंदियाच्या बजाज हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान निधन झाले. बहेकार यांनी १९९०-९५ दरम्यान काँग्रेसच्या सत्ताकाळात राज्यमंत्री म्हणून वन, बांधकाम विभागाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी भाजपचे भैरसिंह नागपुरे यांचा पराभव केला होता. सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्दचे ते सरपंचही होते. त्यानंतर सालेकसा …