Home Uncategorized न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी येथे ‘माइंडसेट ट्रान्सफॉर्मेशन’ विषयावर तीन दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन

न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी येथे ‘माइंडसेट ट्रान्सफॉर्मेशन’ विषयावर तीन दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन

5 second read
0
0
11

no images were found

न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी येथे ‘माइंडसेट ट्रान्सफॉर्मेशन’ विषयावर तीन दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन

 कोल्हापूर(प्रतिनिधी ): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी दिनांक २ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेचा मुख्य विषय माइंडसेट ट्रान्सफॉर्मेशन’ असा होता. प्रसिद्ध वक्ते व प्रशिक्षक श्री. जी. जॉर्ज (Founder and CEO, Shashwatgyan – Course for Life) यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थिनींमध्ये सकारात्मक विचारसरणी, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि यशस्वी जीवनासाठी आवश्यक असणारी मानसिकता विकसित करणे हा होता. तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेमध्ये विविध प्रेरणादायी सत्रे, संवाद, प्रात्यक्षिके आणि समूहचर्चा यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रा. निकिता शेटे मॅडम यांनी केले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. श्रीमती ए. आर. पुजारी मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच चालना मिळाली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –      सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –      सार्वजनिक आरो…