no images were found
कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात संपन्न
▪️ शाही मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन
▪️ सोने लुटण्यासाठी करवीरवासीयांची अभूतपूर्व गर्दी
कोल्हापूर,: विजयादशमीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आज मावळत्या सूर्याच्या साक्षीने शाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात संपन्न झाला.कर्नाटक राज्यातील म्हैसूर नंतरचा देशातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा सुवर्ण क्षण ठरला. सोने लुटण्याच्या या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या करवीरवासीयांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. “सोनं घ्या… सोन्यासारखं रहा” अशा शुभेच्छांसह आपट्याची पाने एकमेकांना देत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.