no images were found
स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव- डॉ. तृप्ती करेकट्टी : विद्यापीठात हिंदी दिवसानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
कोल्हापूर,: विविध स्पर्धांच्या माध्यमातून महाविद्यालय व विद्यापीठ यांचे नाते दृढ होण्यास व
विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना नेहमीच वाव मिळतो, असे प्रतिपादन हिंदी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये हिंदी विभाग व यूको बँक यांच्या संयुक्त विद्यमाने
हिंदी दिवसानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यूको बँकेचे शाखा व्यवस्थापक उदित घई उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
एकपात्री प्रयोग स्पर्धेमध्ये महावीरच्या कार्तिकी गुरवला प्रथम, हिंदी विभागाच्या सुप्रिया पवारला द्वितीय, कमलाच्या श्रेया माळीला तृतीय, हिंदी विभागाच्या अविनाश कांबळे यांना चतुर्थ, साक्षी बाटुंगेला
पंचम पुरस्काराने गौरविण्यात आले. शॉर्ट फिल्म मेकिंग स्पर्धेतील शिवाजी विद्यापीठ, हिंदी विभागाच्या ‘वर्तमान राजनीति और युवा’ (प्रथम), कमला कॉलेजच्या ‘युवा दर्शन या भागीदारी’ (द्वितीय), न्यू
कॉलेजच्या मोबाइल डोपामाइन (तृतीय), शिवाजी विद्यापीठ हिंदी विभागाच्या ‘इन्सानियत’ (चतुर्थ), महावीर कॉलेजच्या ‘सोशल’ (पंचम) पुरस्काराने गौरविण्यात आले. निबंध लेखन स्पर्धेतील महाविद्यालय गटात कमलाच्या गायत्री माने (प्रथम), शहाजीच्या
तेजस्विनी रोहिदास (द्वितीय), न्यूच्या प्रतीक्षा पाटील (तृतीय), न्यूच्या दिलनाज अन्सारी (चतुर्थ),
महावीरच्या आयान मुल्ला (पंचम) पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच विद्यापीठ गटात शीतल चौगले (प्रथम), अविनाश कांबळे (द्वितीय), सानिया मुल्ला (तृतीय), प्रणाली पाटील (चतुर्थ), वर्षा बोरगल्ली (पंचम) यांना गौरविण्यात आले.काव्य-वाचन स्पर्धेतील महाविद्यालय गटात कमलाच्या सेजल गाडवे (प्रथम), महावीरच्या
गुलसनोबर सिद्दीकी (द्वितीय), स.ब. खाडेच्या चैत्राली गुरव (तृतीय), न्यूच्या कस्तुरी धर्माधिकारी (चतुर्थ)
कमलाच्या अनन्या जाधव व स.ब. खाडेच्या संस्कृती चव्हाण (पंचम) यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
काव्य-वाचन स्पर्धेतील विद्यापीठ गटात शीतल चौगुले (प्रथम), अविनाश कांबळे (द्वितीय), संचित कांबळे (तृतीय), विनय जंगम (चतुर्थ), साक्षी बाटुंगे, शब्दा वाघमोडे (पंचम) पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी परीक्षक अनमोल कोठाडिया, अंकिता त्रिभुवने, डॉ. नरसिंग एकिले, संतोष कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आराधना कदम व अविनाश कांबळे या विद्यार्थ्यांनी विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयसिंग कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अक्षय भोसले केले. आभार डॉ.प्रकाश निकम यांनी मानले. यावेळी डॉ. संतोष कोळेकर, डॉ. प्रवीण चौगले, प्रा. अविनाश पाटील, डॉ. गीता
दोडमणी, डॉ. अनिल मकर, डॉ. सुवर्णा गावडे, डॉ. सारिका कांबळे, संशोधक विद्याथी व विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.