no images were found
शाही दसरा महोत्सवात कोल्हापूरकरांनी लुटला विविध राज्यातील लोकनृत्यांचा आनंद
कोल्हापूर,: जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित शाही दसरा महोत्सव अंतर्गत कोल्हापूरकरांनी विविध राज्यातील लोककलांचा आनंद लुटला.
शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे सायंकाळी 6 ते 9 या वेळेत विविध राज्यांतील लोकनृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमात पश्चिम बंगालचे छऊ नृत्य, कर्नाटकचे ढोलू कुनिथा, मध्य प्रदेशचे बधाई-नोरता, तेलंगणाचे बोनालू नृत्य तर महाराष्ट्राचे सोंगी मुखवटे सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह युवक , युवती, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते या कार्यक्रमांमध्ये सहभागी कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी ही शाहू स्मारक येथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.